वजन वाढण्याची कारणं आणि कमी करण्याचे उपाय

आपल्या शरीरात जेव्हा चरबी जास्त साठत जाते, त्यावेळी व्यक्ती लठ्‍ठ होते, आपल्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले म्हणजे लठ्‍ठपणा दिसतो.

Updated: Mar 24, 2014, 04:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या शरीरात जेव्हा चरबी जास्त साठत जाते, त्यावेळी व्यक्ती लठ्‍ठ होते, आपल्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले म्हणजे लठ्‍ठपणा दिसतो.
तसेच लठ्‍ठपणामुळे ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस, हृदयरोग, डायबेटीस आणि संधीवात असे रोग होतात. आपलं वजन आपल्या उंचीप्रमाणे नेमकं किती असावं, यासाठी बॉडी मास इंडेक्स पहावा.
वजन वाढण्याची कारणे
वजन वाढण्याची काही कारणं सामान्यपणे अशी आहेत. शरीरात चरबीची वाढ होणे, कमरेमधल्या चरबीत वाढ. वजन कमी करण्यासाठी औषधांचा काहीही उपयोग होत नाही.
ऍम्फेटामाईन, ड्युरेटीक्स, परगेटीव्ह, अशा सारखी भूक कमी करणारी औषधे हानीकारक ठरू शकतात.
शरीराच्या वजनावर लक्ष असू द्या, वजन कमी करण्याच्या नादात, एकदम आहारात घट करणे, हे सुध्दा सर्वसाधारणपणे योग्य नाही.
अगदी आवश्यक असेल तरच आहारात एकदम घट करणे आवश्यक आहे, अशा वेळी शरीराच्या वजनावर लक्ष ठेवणे आवश्यक असते.
लठ्‍ठपणावर उपाय
आहारात घट आणि व्यायाम हे लठ्‍ठपणा कमी करण्यासाठी महत्वाचे पर्याय आहेत. पिष्टमय पदार्थात घट, चरबी युक्त आहारात घट, योग्य प्रमाणात प्रथिन, जीवनसत्व, आणि खनिज, तंतूमय आहार, आणि भरपूर द्रवयुक्त पदार्थ असा आहार आवश्यक असतो. तसेच योग्य प्रमाणात व्यायाम, जरूरी असतो.
डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. आपलं वजन किती जास्त आहे, या प्रमाणात वजन कमी करण्याचे प्रमाण ठरवा. घाई न करता, दर महिन्याला साधारणपणे २ ते ३ किलो वजन कमी करणे योग्य आहे.
कारण शरीराचं वजन कमी होत असतांना इतर तोटे होण्याची शक्यताही असते, दिवसाला तुम्हाला आवश्यकतेपेक्षा ५०० उष्मांक कमी असणार्‍या आहाराचे सेवन केल्यास दर महिन्याला २ किलो वजन कमी करणे शक्य आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.