मुंबई : एका नव्या अभ्यासात समोर आलंय की, जे पुरूष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला सर्वाधिक आकर्षित होतात. संशोधनानुसार महिलांना त्यांच्या घामाचा गंधही चांगला वाटतो. तज्ज्ञांच्या मते, लसणीत अॅन्टीबायोटीक, अॅण्टीव्हायरल, अॅण्टीफंगलचे गुण असतात.
गार्लिक फर्मच्या नताशा एडवर्डस म्हणतात, लहसून खाणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.
नताशा म्हणतात, "लोक आम्हाला नेहमी म्हणतात, आम्ही मोठ्या प्रमाणात लसूण खाल्ला तर आमच्याजवळ कुणी बसणे पसंद करणार आहे का? आमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही का?"
आम्ही लोकांना हेच सांगतोय, "जेवढे लसूण तुम्ही खाणार, तेवढंच तुमचं शरीर रोगांचा सामना करण्यास आणखी सक्षम होणार आहे. लसणी शरीरासाठी खूप चांगला आहे, यावरील अभ्यासानंतर ही बाब अधिक स्पष्ट होते".
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.