मुंबई : पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.
तणाव घेऊ नका. तणावामुळे अनेक आजार उद्भवतात. तणावचा वाईट परिणाम हा
मणक्यावर होतो. मणक्यावर ताण आल्याने स्नायूच्या वेदना सुरु होतात. त्यामुळे तणावापासून तुम्ही दूर राहणे गरजेचे आहे.
पाठिचे दुखणे असेल तर तळलेले पदार्थ खावू नका. तळलेल्या पदार्थामुळे कप होण्यास मदत होते. त्यामुळे पाठिचे दुखण्याचा वेदना सतावतात. तसेच खाण्यात साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करावे.
पाठिचे दुखणे असेल तर नियमित व्यायाम करण्यामुळे सरकेलेले हाड व्यवस्थित बसण्यास होता. तसेच मणक्यामध्ये गॅप पडला असेल तर कोमल तंतू जोडण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसान व्यायाम करणे पाठ दुखणे कमी होऊ शकते.
पाठिचे दुखणे आपल्या करिअरवर परिणाम करु शकते. त्यामुळे पाठिचे दुखणे रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे. बॅक पेन टाळण्यासाठी खालील टिप्सचा विचार करा आणि या त्रासातून दूर राहा.
- आपण संगणकासमोबर तासनतास बसून काम करीत असाल तर बसण्याबाबत लक्षात घ्या. एकाच ठिकाणी जास्त काळ बसू नका.
- तुम्ही थोड्या थोड्यावेळाने जागेवरुन उठले पाहिजे. शक्य झाल्यास पाच मिनिटे चालने आवश्यक आहे. प्रत्येक एका तासाने ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा.
- तुम्ही काम करताना थकत असाल तर किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्ही कामाची वेळ निश्चित करा. जेणेकरुन पाठिचे दुखणे किंवा बॅक पेनपासून थोडी तरी सुटका होईल.
- तुम्ही बसण्यासाठी खुर्चीचा वापर करताना दोन्ही पायांचे तळवे, टाचा जमिनीला टेकतील अशा प्रकारे आसन व्यवस्था करुन घ्यावी. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
- चुकीच्या पद्धतीने बसण्याचे टाळा. त्यामुळे हाड सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे लोअर बॅक पेनचा त्रास होऊ शकतो.
- आपण काम करताना संगणक आणि डोळे यांचा स्तर आपल्या स्क्रीनप्रमाणे असावा.
- आपण जास्त काळ फोनवर बोलत राहत असाल तर आपले दुखणे वाढते. तसेच डोके आणि मान झुकवून बोलणे टाळा. तुम्ही एकतर हेडसेट किंवा स्पीकरफोनचा उपयोग करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.