उचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय

उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. 

Updated: Oct 8, 2015, 03:15 PM IST
उचकी घालविण्याचे १० रामबाण उपाय  title=

मुंबई : उचकी येण्याची अनेक कारण असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. 

उचकी रोखण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करतात. जसे पाणी पितात किंवा इतर उपाय करून पाहतात. आम्ही असे काही उपाय सांगणार आहेत, की त्याने उचकी छूमंतर होऊन जाईल. 

उचकी लागण्याचे ठोस कारण सांगता येत नाही पण ती सुरू होणे, किंवा गायब होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक अकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. अशात अनेक घरगुती उपाय यातून बाहेर पडण्यात उपयोगी पडतात आणि तुमची उचकी थांबते. 

सामन्या प्रकरणात डॉक्टर टेस्ट करून जाणून घेतात की समस्या कुठे आहे. औषधांनी ही समस्या दूर होते, तर काही प्रकरणात ही समस्या बराच काळ सुरू राहते. अशात धैर्य आणि योग्य वेळेत उपाय करणे गरजेचे आहे. 

उचकी रोखण्याचे काही उपाय 

आपला श्वास रोखून ठेवा :  एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल. 

साखर :  उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे थोड्यावेळात उचकी थांबून जाईल. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकल्यास ते थोडे थो़डे प्यायल्याने उचकी थोड्यावेळात बंद होते. 

लिंबू आणि मध : उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा ताजा रस घ्या त्यात एक चमचा मध टाका आणि दोघांना मिक्स करून चाटण करा. हे चाटण घेतल्यावर उचकी बंद होईल. 

हळूहळू जेवा :  अनेकवेळा फास्ट खाल्ल्याने उचकी लागते, जेवताना हळूहळू आणि चावून जेवा, असे केल्यास उचकी थांबते. फास्ट खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागते. 

चॉकलेट पावडर :  जेव्हाही उचकीच्या समस्या झाली तर तुम्ही चॉकलेट पावडर एक चमचा खा. ती खाल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते. 

मीठाचे पाणी : थोडे मीठ पाण्यात टाकून घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते. 

काळे मिरे :  तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल 

उलटे अंक मोजा :  जाणकारांनुसार उलटे अंक मोजल्याने अचानक त्या व्यक्तीला घाबरविल्यास त्याची उचकी जाते. उलटे अंक १०० ते १ असे माजावे. 

टॉमॅटो : उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटोला धू दातांनी चावून का, उचकी ठीक होईल. उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.