थंड पाण्यापेक्षा गरम पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर

पाणी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याविना जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. एकवेळ माणूस काही न खाता जिवंत राहू शकेल मात्र पाण्याशिवाय नाही. मात्र पाणी कसं प्याव याचेही काही नियम आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. 

Updated: Jan 11, 2016, 01:34 PM IST
थंड पाण्यापेक्षा गरम पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर title=

मुंबई : पाणी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याविना जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. एकवेळ माणूस काही न खाता जिवंत राहू शकेल मात्र पाण्याशिवाय नाही. मात्र पाणी कसं प्याव याचेही काही नियम आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. 

आपल्या शरीराचे तापमान साधारण ९८.६ डिग्री सेल्सियस असते. यानुसार अधिक थंड पाणी प्यायल्यास याचे तापमान सामान्य करण्यास शरीरास अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नेहमी गरम पाणी प्यावे. सकाळी उठून कोमट पाणी पिण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर देतात.

गरम पाण्यामुळे शरीर आतून साफ होते. तुमची पाचनक्रिया योग्य नसेल तर दिवसातून दोन वेळा गरम पाणी प्यायले पाहिजे. तसेच गरम पाणी प्यायल्याने वजनही कमी होते. त्याचबरोबर पोटाच्या तक्रारीही दूर होतात. मात्र अधिक गरमही पाणी पिऊ नये.