या कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा

प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. 

Updated: Feb 1, 2016, 10:32 PM IST
या कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा title=

मुंबई: प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. 

याआधी नेस्ले इंडियाकडून महिलांना 18 आठवड्यांची प्रसुतीसाठीची रजा दिली जायची. तसंच दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आईला 6 आठवड्यांची रजा देण्यात येणार आहे. याबरोबरच वडलांना 5 दिवसांची सुट्टी आणि पूर्ण वेतन द्यायचा निर्णयही नेस्लेनं घेतला आहे.

कंपनीतल्या महिलांना सशक्त बनवण्यासाठी तसंच कंपनीमध्ये चांगलं वातावरण तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला अशी प्रतिक्रिया नेस्ले इंडियाचे चेअरमन सुरेश नारायणन यांनी दिली आहे.