केसगळतीवर गुणकारी आहे कांद्याचा रस

केंसाचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. 

Updated: Feb 2, 2016, 08:54 AM IST
केसगळतीवर गुणकारी आहे कांद्याचा रस title=

मुंबई : केंसाचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. 

केसगळतीसाठी कांद्याचा रस हा उपयुक्त ठरु शकतो. कांद्याच्या रसामुळे केस गळती कमी होते यासोबतच केंसांची वाढही होते. कांदा एक नैसर्गिक कंडिशनरचे काम करतो. या रसाच्या नियमित वापरामुळे केसगळती कमी होते तसेच केसांचा चमकही येते. कांद्यामध्ये योग्य प्रमाणात सल्फर असते ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.  

कांद्याच्या रसाचा उपयोग कोंडा दूर करण्यासाठीही होतो. मात्र याचा योग्यपद्धतीने वापर करणे गरजेचे असते. 

केसगळतीची आणि कोंड्याची समस्या असेल तर मध आणि कांद्याचा रस एकत्रित करुन लावणे फायदेशीर ठरते. कांद्याचा रस आणि मध समप्रमाणात घेवून त्याचे मिश्रण तयार करा. स्काल्पला हे मिश्रण लावून काही वेळाने कोमट पाण्याने केस धुवा

बदामाच्या तेलातही अनेक पोषणतत्वे असतात. बदामाच्या तेलात कांद्याचा रस मिसळून लावल्यास केसगळतीची समस्या दूर होते. तसेच केस दाट, मुलायम आणि चमकदार बनतात. तुम्ही बदामाच्या तेलाऐवजी नारळाचे तेलही वापरु शकता. 

गरम पाण्यात कांद्याचा रस मिसळून लावल्यासही फायदेशीर असते. यामुळे केस घनदाट होतात.