योगा करा आणि धूम्रपान सोडा!

Updated: Oct 30, 2014, 08:25 PM IST
योगा करा आणि धूम्रपान सोडा! title=

 

 

नवी दिल्ली : धूम्रपानचे काय दुष्परिणाम आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी ही सवय सुटत नाही. एका अध्ययनातून असे सांगितले जाते की, धूम्रपान सोडयचं असेल तर प्राणायम योगा सर्वात जास्त उपयोगी पडेल. योगाचे अभ्यासक दीपक झा यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय. योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणाऱ्या दुष्परिणाम सुद्धा लांब ठेऊ शकतो.

धूम्रपान सोडण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उपाय उपलब्ध आहेत. पण, धूम्रपान रोखण्यासाठी याचा वापर एवढा प्रभावशील नाही. सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे शरीराला धोका असणारे पदार्थ शरीरात प्रवेश करून रक्त गोठायला सुरुवात होते. त्यामुळे याचा परिणाम हृदय आणि रक्तदाबवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन रक्तातील अभिसरण कमी करतं.  

धूम्रपानच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. धूम्रपानामुळे श्वसनावर होणाऱ्या परिणाम रोखण्यासाठी योगा हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थांना लांब ठेवले जाते, असे झा यांनी म्हटलंय. त्याचबरोबर तणाव आणि चिंतेपासून दूर ठेऊन आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो. सर्वागासन (शोल्डर स्टँड), सेतू बंधासन (ब्रिझ मुद्रा), भुजंगासन (कॉबरा पोझ), शिशुआसन (बाल पॉझ) या सर्व योगासांनामुळे स्मोकिंगपासून सुटका होण्यास मदत होते.     
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.