नवी दिल्ली : प्रत्येकाच्या झोपण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काहींना उपडे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही सवय लगेचच सोडू द्या.
पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांमध्ये अपस्मारीचे विकार आढळतो. यामुळे आकस्मिक मृत्यूची भिती असते. अपस्मार हा मेंदूसंबंधित आजार आहे. यामुळे फिट्स येतात.
जगातील तब्बल पाच कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत. हा त्रास वय वर्षे सहा ते पंचवीस वर्षांपर्यंत असतो. अनेक लहान बालकांना पोटावर झोपण्याची सवय असते. त्यामुळे अपस्मारचा धोका अधिक वाढू शकतो. शिकागो विद्यालयात या आजारावर करण्यात आलेल्या संशोधनात पोटावर झोपण्याच्या सवयीमुळेही अपस्मारचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे आढळून आले.