हिवाळ्यातील आजार, हे करा घरगुती ५ उपाय

थंडीचा मोसम सुरु झालाय. या हिवाळ्यात आपल्याला साधे आजार होतात. मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. लोक सर्दी, खोकला, शीतज्वर आणि इतर सामान्य जीवाणू आणि व्हायरस पसरतात आणि आपण बेजार होतो.

Updated: Dec 16, 2015, 01:12 PM IST
हिवाळ्यातील आजार, हे करा घरगुती ५ उपाय   title=

नवी दिल्ली : थंडीचा मोसम सुरु झालाय. या हिवाळ्यात आपल्याला साधे आजार होतात. मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. लोक सर्दी, खोकला, शीतज्वर आणि इतर सामान्य जीवाणू आणि व्हायरस पसरतात आणि आपण बेजार होतो.

थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण लोकरीचे कपडे परिधान करतो. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतो. मात्र, थंडीपासून आजार टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करा आणि आपले आजार पळवा.  

खोकला : आले टाकून चहा घ्या
खोकला असेल तर आलेयुक्त चहा घ्या. खोकला आणि सर्दी झाल्यास तसेच खोकल्याने घसा खवखवणे यावर अतिशय उपयुक्त असा उपचार म्हणजे आले घालून केलेला चहा घेणे. तसेच मधात आले टाकून ते चघळणे. त्यामुळे पोटातील मळमळ थांबते.  

थंडीत चिकन सूप प्या :
चिकन सूप घेतल्याने थंडीपासून तुमचा बचाव होता. नाक चोंदले असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चिकन सूप त्यापासून तुमची सुटका करते. श्वसन प्रक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. चिकन सूपमधील कार्बोहाइड्रेट ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करते.

कोरडी पडणाऱ्या त्वचेला कोरफड लावा 
थंडीमुळे आपली त्वचा शुष्क होते. किंवा कोरडी पडते. त्वचा चांगली आणि नितळ राहण्यासाठी तुम्ही कोरफड (AloeVera mask) लावा. त्यामुळे त्वचा पेशी दुरुस्ती होते. AloeVera mask मधून antioxidants आणि जीवनसत्त्वे त्वचेला मिळातात. त्यामुळे कोरफड थंडीत फायदेशीर ठरते.

बडीशेफ कफावर उत्तम :
थंडीत आपल्याला सर्दी होते. त्यामुळे कफ होतो. कफ झाल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळते. आपली पचन क्षमताही बिघडते अशावेळी बडिशेफ खाणे चांगले. त्यामुळे आपल्याला आराम पडतो.

नाक चोंदले असेल तर नीलगिरीचे तेल उत्तम :
सर्दीमुळे बऱ्याचवेळा आपले नाक वाहते किंवा जाम होते. यावर उत्तम उपाय म्हणजे नीलगिरीचे तेल. नीलगिरीचे दोन थेंब नाकात टाकावेत. नीलगिरी बॅक्टीरिअल आणि जिवाणू विरोधी तसेच या तेलात बुरशीजन विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे खोकला, सर्दी, दमा यासाठी हे तेल अत्यंत गुणकारी ठरते.