नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवसही झाले नाहीत तोच एनडीएमध्ये फूट पडली. हरियाणा जनहीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कुलदीप बिश्नोई यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
तीन वर्षांपूर्वी भाजप आणि एचजेसी हे पक्ष एकत्र आले होते. भाजपचा इतिहास हा नेहमी दगा देणारा असुन, लोकसभेच्या दोन्ही जागांवर झालेल्या पराभवास भाजप जबाबदार असल्याचा आरोप बिश्नोई यांनी केली आहे.
तर दुसरीकडे भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी एचजेसीही ही काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप करत. स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.