`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 17, 2013, 03:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.
पाकिस्ताननं दोषींवर कारवाई केल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध सुधारणा होणं शक्य नाही, पाकिस्तानानं परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय सैनिकांच्या हत्या करणाऱ्यांना कडक सजा द्यायला हवी, असं मनिष तिवारी यांनी म्हटलंय. पाकिस्ताननं कडक कारवाईचं धोरण स्वीकारलं तरच दोन्ही देशांमध्ये चर्चेचे मार्ग मोकळे होतील, असं तिवारी यांना वाटतंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत आज कॅबिनेटच्या बैठकीत पाकिस्तान मंत्री हिना रब्बानी खार यांनी ठेवलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे.

भारताला 'युद्धखोर' संबोधून उलट्य़ा बोंबा मारणा-या णा-या पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी-खार यांची भाषा आज अचानक मवाळ झालीये. त्यांनी चक्क परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत चर्चा कऱण्याचं निमंत्रण दिलंय.