नवी दिल्ली : जगभरात आयसिसच्या वाढता प्रभाव पाहता भारतातही आयसिस आपले हातपाय पसरवत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. भारतातील तब्बल १५० युवक आयसिसच्या संपर्कात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व युवकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
या युवकांपैकी सर्वाधिक युवक हे दक्षिण भारतातील आहेत जे इंटरनेटच्या सहाय्याने आयसिसच्या संपर्कात आले आहेत. याआधीही भारतातील तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. भारतातातून आतापर्यंत २३ जण इराक आणि सीरिसायमध्ये गेले आहेत. ज्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून एक मुंबईत परत आला.
आयसिसकडून भारताला धोका असल्याची भिती यापूर्वी सरकारनेही व्यक्त केली होती. या संकटाला मुकाबला करण्यासाठी भारताची तयारी सुरु असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 'भारतालाही आयसिसचा धोका आहे. ज्याप्रमाणे पॅरिसमध्ये हल्ला झाला तशाच प्रकारचा हल्ला आठ वर्षांपूर्वी मुंबईत झाला होता. ज्यात १५० हून अधिकांचा मृत्यू झाला होता. ही समस्या एका देशाची अथवा एका प्रांतांची नाही. संपूर्ण जगाने एकत्र येऊन याविरोधात लढा द्यायला हवा,' असे राजनाथ म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.