नवी दिल्ली : काळ्या पैशांवर मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींवर जरीही विरोधक टीका करत असले तरी पंतप्रधानांनी यावर मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे.
५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. बीपीएल धारकांबाबत म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. बीपीएल धारकांना दुसऱ्यांचे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करणं महागात पडू शकतं. बीपीएल धारकांनी जर त्यांच्या खात्यात ३९ हजारापेक्षा अधिक पैसे जमा केल्यास त्यांना त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे.
बीपीएल धारकांच्या खात्यात जर ३९ हजाराहून अधिक पैसे जमा झाल्यास आणि त्याचा हिशोब नसल्यास त्यांना शिक्षा होणार आहे. बीपीएल कार्डची पात्रता देखील रद्द होऊ शकते. तसेच त्यांना २०० टक्के दंड होणार आहे. त्यामुळे कोणीही पैशाचं आमिष दाखवून तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगत असेल तर सावध व्हा.