www.24taas.com, झी मीडिया, बासवाडा
दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.
खरी गोष्ट म्हणजे नवागाव स्थित जीएसएस जवळच्याच उंचावर आहे. यामुळे, या गावांत विद्युत लाईनमध्ये आर्थिंग आणि न्यूट्रल लाईन काम करणं बंद झालंय. त्यामुळे या गावांत पूर्ण व्होल्टेनं वीजपुरवठाच होत नाही. त्यामुळे, वीज मिळवण्यासाठी गावकऱ्यांकडे झुगाड करण्यावाचून पर्याय नव्हता.
मग काय, गावकऱ्यांनी डीपीजवळ स्वत:चीच आर्थिंग सुरू केली आणि आपलं घरात रोषणाई आणली. इथं जवळपास 5-6 तासांनी एक-एक बादली पाणी टाकणं गरजेचं आहे. या गावात जवळपास चार हजारांपेक्षा जास्त विद्युत उपभोक्ते आहेत. नवागावमध्ये 10-12 डीपी आणि जवळपासच्या इतर गावांत दोन-दोन डीपी आहेत.
यामध्ये, मुख्य लाईनला आर्थिंग जोडलेली असते. त्यामुळे गावकऱ्यांना पूर्ण व्होल्टेजनं विजेची उपकरणं सुरू असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उन्हामुळे जमीन लवकर सुकते. त्यामुळे यामध्ये दिवसातून अनेकदा इथं पाणी टाकावं लागतं.
नवागावमध्ये हीच परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून कायम आहे. यामुळेच, आता गावकऱ्यांनी गावात सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरजवळ आर्थिंग लावून ही स्वत:पुरती सोय केलेली दिसते. यावर लवकरात लवकर उपाय काढण्यासाठी आर्थिंग लाईन टाकण्याची तयारी इथं सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.