जम्मू: उधमपूरला बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलंय. कासिम खान असं त्या दहशतवाद्याचं नाव आहे. तो अवघ्या 18 वर्षांचा आहे.
जवानांच्या तुकडीवर हल्ला करून हे दहशतवादी फरार झाले होते आणि त्यांनी तीन नागरिकांना बंधक केलं होतं. मात्र त्याच नागरिकांनी या दहशतावाद्याला पकडलं आणि आपल्या शौर्याचा परिचय दिलाय.
रिपोर्टनुसार पहिले लोकांनी त्याची बंदूक हस्तगत केली आणि त्यानंतर त्याला पकडलं. नंतर सेनेच्या जवानांच्या ताब्यात त्याला दिलं. ही खूप मोठी कामगिरी त्यांनी केलीय. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबनंतर पहिल्यांदाच जिवंत दहशतवादी पकडण्यात यश आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.