आग्रा : एखाद्या परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थ्यी पास झाल्याचे आपण ऐकले आहे. मात्र परीक्षा देणाऱ्यांपेक्षाही पास होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? बी.आर. आंबेडकर युनिर्व्हसिटीत हा प्रकार घडलाय. या युनिर्व्हसिटीत नुकतीच बीएडची परीक्षा झाली. याचा निकाल पाहून युनिर्व्हसिटीचे अधिकारीही हैराण झाले. या परीक्षेत १२ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २० हजार दाखवण्यात आलीये.
दरम्यान, याप्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आलेत. तसेच तपासासाठी समितीचीही स्थापना करण्यात आलीये. बीएडच्या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ८०० नियमित विद्यार्थ्यी बसले होते मात्र निकाल जाहीर झाला तेव्हा पास झालेल्या उमेदवारांची संख्या २० हजार ८९ इतकी दाखवण्यात आली.
युनिर्व्हसिटीचे प्रवक्ता मनोज श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जवळच्या कंपनीला निकाल घोषित करण्याचे काम दिले होते. हे निकाल तयार करताना परीक्षा पेपरची संख्या २० हजार आढळून आली. मात्र या परीक्षेसाठी केवळ १२ हजार ८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.