नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वात अनेक कलाकारांनी मोर्चा काढलाय. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
जनपथवरून सुरू झालेला हा मोर्चा राष्ट्रपती भवनापर्यंत जाणार आहे. वाढत्या असहिष्णुतेविरोधात देशातल्या अनेक साहित्यिक आणि चित्रकर्मींनी पुरस्कार परत केलाय. मात्र, देशातली सहिष्णुता अबाधित असल्याचा दावा करत पुरस्कार परत करणाऱ्यांवर खेर यांनी टीका केलीय.
या मोर्चात मधुर भांडारकर, अनुप जलोटा, मालिनी अवस्थी, प्रियदर्शन, नितीन देसाई, विवेक ओबेरॉय, साहित्यिक नरेंद्र कोहलींनी सहभाग घेतला. राष्ट्रपती भवनावर मोर्चा पोहचल्यावर राष्ट्रपतींना निवेदन दिलं जाणार आहे. या मोर्चाला मोठं समर्थन मिळत असल्याचा दावा अनुपम खेर यांनी केला.
दरम्यान, राजधानी दिल्ली पाठोपाठ मुंबईतही पुरस्कार परतीविरोधात मोर्चा काढण्यात आला. मुंबईतल्या बांद्रा भागात हा मार्च काढण्यात आला. खार पोलिसांनी यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.