www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी देशातील भ्रष्टाचारी नेत्यांची एक यादीच सादर केलीय. यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांचा आणि नेत्यांचा समावेश आहे.
`आप`च्या कार्यकर्त्यांशी बोलताना केजरीवाल यांनी `आपलं उद्दीष्ट `आप` या पक्षाला नाही तर देशाला मजबूत बनवण्याचं` असल्याचं सांगितलंय. यासाठी आपण देशातील भ्रष्टाचाऱ्यांना निवडून देता कामा नये, असंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी, या यादित राहुल गांधींच्या नावाचाही समावेश असायला हवा, असा आरडा-ओरडा कार्यकर्त्यांनी केल्यानंतर केजरीवाल यांनी `राहुल गांधीही त्यापैंकीच एक आहेत` असं म्हटलंय. ` देशातील या भ्रष्टाचारी व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आपण संसदेत पाऊल ठेऊ देता कामा नये` असं केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना बजावलंय. तसंच या यादीत नाव नसणाऱ्या आणखी भ्रष्टाचाऱ्यांची नावं समोर आणावीत असं आवाहनही केजरीवाल यांनी केलंय.
केजरीवाल यांची देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांची यादी
* सुरेश कलमाडी
* नितीन गडकरी
* सुशीलकुमार शिंदे
* बी. एस. येडुरप्पा
* कपिल सिब्बल
* मुलायम सिंग
* कमल नाथ
* विरप्पा मोईली
* अनंत कुमार
* अनुराग ठाकूर
* शरद पवार
* प्रफु्ल्ल पटेल
* पी. चिदंबरम
* अलागिरी
* कानिमोझी
* ए. राजा
* तरुण गोगोई
* मायावती
* नवीन जिंदाल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.