नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाकिस्तानला जाणार आहेत. नाही, कोणत्याही नेत्याने त्यांना 'पाकिस्तानला जा' असं सांगितलं नाहीये... तर ते कराची साहित्य संमेलनासाठी पाकिस्तानला जाणार आहेत.
२०१७ साली पाकिस्तानातील कराची येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनासाठी अरविंद केजरीवालांना निमंत्रित करण्यात आलं होतं. आज त्यांनी हे आमंत्रण स्वीकारत आपण त्यासाठी पाकिस्तानला जाणार असल्याचं घोषित केलंय.
फेब्रुवारी २०१६ साली बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना याच साहित्य संमेलनासाठी व्हिजा नाकारण्यात आला होता, यामुळे वादंग उठला होता.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पाकिस्तान आणि ब्रिटिश काऊन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात येतं. यात साहित्यावर भाषणं, संवाद, पुस्तक प्रकाशन आणि कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित केले जातात.