www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
बंगळुरूमध्ये काल एटीएममध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला आंध्रप्रदेशमधून अटक करण्यात आलीय. पकडलेल्या व्यक्तीकडून हल्ला झालेल्या महिलेचा मोबाईल फोन सापडलाय. अटक झालेल्या व्यक्तीनं तो हल्लेखोराकडून खरेदी केला होता.
कार्पोरेशन बँकेच्या मॅनेजर असलेल्या ज्योती उदय यांच्यावर बंगळुरूत एटीएममध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून जगण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करण्यात यश मिळालं नाहीय. कर्नाटक पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक नेमलंय. जे की राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये आरोपीचा शोध घेत आहेत.
यासंदर्भात कनार्टक पोलीस शेजारील राज्य आंध्रप्रदेश, गोवा, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूकडूनही मदत घेत आहेत. २५-३५ वयोगटातला हा आरोपी एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतोय.
दरम्यान, पोलिसांनी आंध्रप्रदेशातून ज्योती यांचा फोन हस्तगत केलाय. जो की आरोपीनं विकला होता. मंगळवारी रात्री बंगळुरूतल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या या महिलेवर आरोपीनं हल्ला केला आणि तिला लुटलं. रोख अडीच हजार रुपयांसोबत मोबाईल आणि ज्योति यांच्या अंगावरील दागिने त्यानं लंपास केले.
ज्योती यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तब्बल तीन तास त्या तशाच होत्या. खूप रक्तस्राव झाल्यानं त्या गंभीर आहेत. त्यांच्या शरीराच्या उजव्या भागाला लखवा मारला असून मेंदूलाही खूप इजा झालीय.
एकही सिक्युरीटी गार्ड नसलेल्या या एटीएमच्या सीसीटीव्ही हा सर्व प्रकार कैद झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ