UPDATE 10.45 PM : बंगळुरू स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई आणि पुणे शहरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे शहरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुढील दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशन वेळी विशेष सावधानता ठेवण्याची गरज आहे, मुंबई आणि गोव्यात नववर्षानिमित्त देशी आणि परदेशी पर्यटकांची मोठी मांदियाळी आहे.
UPDATE 10.30 PM बंगळुरू स्फोटातील गंभीर जखमी महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे, या महिलेचं नाव भवानी असं असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.
बंगळुरू : बंगळुरू शहरात चर्च स्ट्रीट परिसरात स्फोट झाला आहे. या स्फोटात २ जण गंभीर, तर २ किरकोळ जखमी झाले आहेत. हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या स्फोटात आयईडीचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकऱणी केंद्र सरकार कर्नाटक सरकारच्या संपर्कात आलं आहे. स्फोटाच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी फोनवर बातचीत केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.