अहमदाबाद : काश्मीर मुद्द्यावर आम्ही तोडगा काढण्यात यशस्वी होऊ असा, विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपा राष्ट्रहितासाठी कधीच तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर पीडीपीसोबतची युतीही तोडून देऊ असंही अमित शहा यांनी म्हटलंय.
फुटिरतावादी नेता मसरत आलमच्या सुटकेने जम्मू काश्मीरमधील पीडीपी - भाजपा सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सत्ताधारी फुटिरतावाद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप विरोधक करत आहे.यापार्श्वभूमीवर अमित शहा यांनी गुजरातमधील नारायणपूरा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जम्मू काश्मीर संदर्भात भाजपाची भूमिका मांडली.
सत्तेसाठी आम्ही देशहिताशी तडजोड करणार नाही, काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठीच आम्ही तिथे सरकार स्थापन केले आहे असे शहा यांनी स्पश्ट केले. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यात आम्ही अयशस्वी ठरलो तर पीडीपीसोबतची युती तोडण्यापासून रोखू शकणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
भाजपा देशहिताशी तडजोड करणार हा संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला हवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.