अलाहाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे. अलाहाबादमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक झाली, या बैठकीनंतर मोदींनी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये मोदींनी मुलायम, मायावती आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.
आसामसारखं उत्तर प्रदेशातही परिवर्तन आणा अशी साद मोदींनी जाहीर सभेतून उत्तर प्रदेशच्या जनतेला घातली. उत्तर प्रदेशला मुलायम आणि मायावतींच्या ठेकेदारीतून मुक्त करा असं जाहीर आवाहनही मोदींनी केलं.
उत्तर प्रदेशमध्ये गुंडगिरी वाढली असून मोठ्या परिवर्तनाची गरज असल्याचं मोदींनी भाषणात नमूद केलं. तर अमित शाहांनी कैरानातल्या हिंदूंच्या पलायनाचा मुद्दा उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रचाराची दिशा स्पष्ट केली.