www.24taas.com,झी मीडिया,पाटणा
बिहारमधलं बोधगया मंदिर रविवारी साखळी स्फोटाने हादरलं. या बॉम्बस्फोटप्रकरणी आता आणखी चार जणांना अटक करण्यात आलीय.
या मंदिरात झालेल्या स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. बोधगया इथं दहा साखळी स्फोट झाले. स्फोट घडवून आणण्यासाठी अमोनियम नायट्रेडचा वापर करण्यात आल्याचं बिहार पोलिसांनी माहिती दिली होती.
सध्या बोधगया इथं झालेल्या स्फोटाचे शोधकार्य जोरात सुरु आहे. एका महिलेसहित चार लोकांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांची चौकशी केली जात आहे. दहशतवादी हल्ल्याच्या सीसीटीव्ही फूटेजमधून सध्या कोणताही पुरावा मिळत नाहीय, अशी माहिती तेथील शोधकर्त्यांनी दिलीय.
पोलिसांनी मंगळवारी या चार जणांना ताब्यात घेतलंय. या चौघांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या चौघांना मंदिर परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ताब्यात घेण्यात आलंय. या चौघे रविवारी सकाळी संशयित पद्धतीनं मंदिरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये आढळले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.