अजमेर : मधुचंद्राला नऊ वधूंनी दागिने आणि रोख रक्कम लंपास केली, या प्रकरणी नऊ वधूंना अटक करण्यात आली आहे. तरुण आणि घटस्फोटीत पुरुषांना लग्नाच्या बेडीत अडकवण्यात आलं, आणि मधुचंद्राला दागिने आणि रोख रक्कम लुटून रफूचक्कर होण्याचा हा प्रयत्न होता.
पोलिसांनी मास्टरमाइंडला अटक केली आहे. लबाडीने पुरुषांची फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या ९ वधूंशी चौकशी सुरू केली आहे.या टोळीचा मुख्य गफ्फार मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तिसगढ येथील महिलांच्या मदतीने हा धंधा चालवत होता.
या मुलींमुळे पैसा, तसेच समाजात प्रतिष्ठा गेली, अशी तक्रार पीडित दुखी कुटुंबांनी केल्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केली. एखाद्या संपन्न कुटुंबात लग्न लावायचं आणि मधुचंद्राला दागदागिने आणि रक्कम लंपास करण्याचे धंदे ही टोळी करत होती.