रूग्णालयात रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश

रूग्णांच्या सोईसाठी रूग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी आज रात्रीपर्यंत रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Updated: Nov 11, 2016, 08:08 PM IST
रूग्णालयात रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश title=

नाशिक : रूग्णांच्या सोईसाठी रूग्णालय आणि औषध विक्रेत्यांना रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आरोग्य मंत्र्यांचेही तसे आदेश आहेत. या आदेशाचं उल्लंघन करून रूग्णांना वेठीला धरल्यास फौजदारी गुन्हे दाखल होतील. 

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारी सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची, बँकेच्या प्रतिनिधींची, व्यावसायिकांची तातडीने बैठक बोलावून अडचणी जाणून घेण्य़ात आल्या, त्यावर उपायही सुचवले. 

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 1077 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे.