अहमदाबाद : जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या पोकेमॉन गो या गेमविरुद्ध गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.
पोकेमॉन गोमध्ये दाखवले जाणारी व्हर्चुअल अंडी धार्मिक स्थळांवर उमटतात. त्यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.
ही याचिका गुजरात हायकोर्टानं दाखल करून घेतलीय.. त्याचप्रमाणे गुजरात सरकार आणि गेम तयार करणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितलंय.