संसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता

संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 3, 2015, 09:47 AM IST
संसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता title=

नवी दिल्ली: संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.. गेल्या १३ दिवसांपासून संसदेचं कामकाज झालेलं नाही. एकाही विधेयकावर चर्चा झालेली नाही.. ३ आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात ११ जुन्या आणि ९ नवीन विधेयकांवर चर्चा अपेक्षित होती. 

मात्र व्यापम घोटाळा, ललितगेट प्रकरणी विरोधक आक्रमक आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र सरकारनं त्याला इन्कार केलाय. विरोधक चर्चेसाठी तयार नसल्याचा आरोप सरकारनं केलाय. याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत ही कोंडी फुटण्याच्या दृष्टीनं काही निर्णय होतो का याकडं नजरा लागल्यात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.