नवी दिल्ली : डॉन छोटा राजनच्या बहिणींनी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाला भेटता यावे, अशी विनंती सीबीआयला केली होती. मात्र, सुरक्षितेच्या कारणास्तव ही भेट नाकारण्यात आलेय.
राजनला भाऊबीजेला भेटता यावे, यासाठी बहिणींनी परवानगी मागितली होती. राजनच्या बहिणींनी त्यासाठी सीबीआय न्यायालयात शुक्रवारी विनंती अर्ज दाखल केला.
सध्या छोटा राजनला कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालय छोटा राजनला त्याच्या बहिणींना भेटून देण्याची शक्यता कमी होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालेय. काही दिवसांपूर्वीच छोटा राजन याला अटक करून भारतात आणण्यात आले होते.
दिल्ली आणि मुंबई येथे त्याच्यावर खंडणी, अमली पदार्थ तस्करी, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. राजनची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.