चीन देतंय पाकिस्तानी सैन्याला शिकवणी..

Updated: Nov 15, 2014, 07:18 PM IST
चीन देतंय पाकिस्तानी सैन्याला शिकवणी.. title=

 

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये चिनी सैन्य पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण देत असल्याची माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली.याशिवाय सीमा रेषेलगत पाकिस्तानी रेंजर्सऐवजी पाक सैन्याचे विशेष पथक नेमण्याची तयारीही पाकने सुरू केल्याचे समझते

भारत - पाक सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण असतानाच भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) गोपनीय विभागाला पाक व्याप्त काश्मीरमध्ये हालचालींची माहिती मिळाली आहे. यामध्ये  चिनी सैन्यातील तज्ञ पाक सैन्याला अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण देत असल्याचे बीएसएफच्या निदर्शनास आले आहे. पाक सैन्याला नेमक्या कोणत्या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे याचा खुलासा अद्याप झाला नाही. 

पाक सैन्यातील संभाषणावरुन पाक सैन्य आणि पाकिस्तानी रेंजर्स भारतीय जवान आणि मालमत्तेला लक्ष्य साधण्यासाठी महत्त्वाच्या चौक्यांवर अचूक नेम असलेल्या जवानांची नियुक्ती करत असल्याचे समोर आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.