पाटणा : मी दिलेला सल्ला ऐकला नाही म्हणून उद्धव ठाकरेंवर आज ही परिस्थिती आलीय, असं म्हणणं आहे भाजपचे ज्येष्ठा नेते लालकृष्ण आडवाणी यांचं...
भाजपसोबतच राहण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी ऐकला नाही, त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं, असं वक्तव्य करत शिवसेनेला टोला हाणण्याचं काम लालकृष्ण आडवाणींनी आज केलंय. बिहारमध्ये एका शाळेच्या उदघाटनासाठी लालकृष्ण अडवाणी असताना ते बोलत होते.
‘विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवू नका... भाजपसोबतच राहा असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता... पण तो त्यांनी ऐकला नाही... आज त्याचंच फळ त्यांना मिळतंय’ अशा शब्दात शिवसेना-भाजप या एकेकाळच्या युतीचे शिल्पकार असलेल्या लालकृष्ण अडवाणींनी टीका केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.