मुंबई: मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.
हा तांदूळ एका विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकचा आहे. हा तांदूळ कसा बनतो याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध झालाय.
चीनचा तांदूळ भारतीय तांदळाच्या भावापेक्षा स्वस्त मिळतो आणि छान दिसतो. या प्लास्टिक तांदळाची केरळमध्ये खरेदी-विक्री झाल्याचं समोर आलंय. हळूहळू तामिळनाडू, कर्नाटकातही हा तांदूळ विकला जावू लागलाय.
हा प्लास्टिक तांदूळ आरोग्यसाठी अतिशय हानिकारक आहे. पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. सामान्य माणसाला तो ओळखता येत नाहीय. त्यामुळं तांदूळ खरेदी करतांना सावधान!
पाहा कसा बनतो प्लास्टिक तांदूळ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.