नवी दिल्ली : जपानी कार कंपनी टोयोटा ने भारतातील 7 हजार 129 मोटारी परत मागविल्या आहेत. 'एअरबॅग‘मध्ये दोष आढळल्याने या मोटारी परत मागवण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये टोयोटा ही कंपनी किर्लोस्कर उद्योग समुहासोबत संयुक्त व्यवसाय करते. किर्लोस्कर समूहाने दिलेल्या माहितीप्रमाणे एप्रिल 2007 ते जुलै 2008 दरम्यान विकलेल्या मोटारी परत मागविण्यात येत आहेत.
कंपनीच्या एका प्रसिद्ध पत्रकामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये टोयोटाने किर्लोस्कर समूहासोबत तयार केलेल्या 'कोरोला' मॉडेलच्या मोटारी परत मागविल्या आहेत.
एअरबॅगमध्ये दोष आढळून आल्याने "टोयोटा‘ने जगभरातील मोटारी परत मागविल्या आहेत. त्या अभिमानाचा एक भाग म्हणून भारतातील मोटारीही परत मागविण्यात येत आहेत.
दरम्यान, या मोहिमेमुळे किर्लोस्कर समूहासोबतच्या व्यवसायामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नसल्याचे टोयोटा ने स्पष्ट केले आहे. एअरबॅगमध्ये दुरुस्ती करण्यासाठी भारतामध्ये विक्री झालेल्या 7 हजार 129 मोटारी परत मागविण्यात आल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.