नवी दिल्ली : केंद्रीय हवाई उड्डान मंत्री अशोक गजपती राजू आपल्या विवादीत वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. विमानात माचिस घेऊन प्रवास करत असल्याचे त्यांनी वक्तव्य
केले आहे.
मंगळवारी केलेल्या आपल्या वक्तव्यात त्यांना म्हटंले की, 'मी विमान प्रवास करतांना नेहमी स्वत: जवळ माचिस बॉक्स बाळगतो, आणि सतत असं करुन मी कायदा मोडतो. तसेच
माझी कोण तपासणीही करत नाहीत.'
राजू यांनी असंही सांगितले की, मी जगात कुठेही माचिसमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असं ऐकलेले नाही. जेव्हा पासून मी हवाई उड्डान मंत्री झालो आहे, विमानतळावर माझी
कोण तपासणीही करत नाहीत. माझ्याकडे नेहमी सिगरेट आणि लाइटर असते पण कोणीही ते तपासत नाहीत.
राजू यांच्या या वक्तव्यांमुळे हवाई सुरक्षेची पोल खोलली आहे. जगातील दहशतवादी कारवायांचे संकट पाहता देशातील विमानतळावर सुरक्षा कशी आहे हेच यातून समोर येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.