www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही दिवसांमध्ये रुपयाच्या मूल्यात झालेली घट आणि त्याचा आयात-निर्यातीच्या दरांवर झालेला परिणाम आता सर्वसामान्यांनाही जाणवू लागलाय.
नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी गॅसच्या दरांतही वाढ करण्यात आलीय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीसाठी ग्राहकांना प्रति किलो तीन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. पाईप गॅसच्या दररचनेतही बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
नव्या दरवाढीमुळे स्थानिक करांसह मुंबईत सीएनजीसाठी प्रतिकिलो ३८.९५ रुपये तर, ठाण्यात ३९.६९ रुपये प्रतिकिलो मोजावे लागणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रुपयाची किंमत घसरत असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या किंमतीत वाढ होण्याच शक्यता वर्तविण्यात येत होती. गॅस दरवाढीमुळे ती काही अंशी खरी ठरली आहे. आता पेट्रोल, डिझेलही महागणार की काय, या चिंतेने सर्वसामान्यांना ग्रासले आहे.
सीएनजीचे नवे दर (रुपयांत)
मुंबई - ३८.९५
ठाणे - ३९.६९
नवी मुंबई - ३९.४४
मीरा रो़ड - ३९.२६
भिवंडी - ३९.४४
तळोजा - ३८.९५
अंबरनाथ - ३८.९५
पनवेल - ३८.९५
खारघर - ३८. ९५
कल्याण - ३९.२०
उल्हासनगर - ३९.९४
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.