नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना पटियाला कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मनमोहन सिंह यांना ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
या घोटाळ्यात मनमोहन सिंह यांच्यासह माजी कोळसा सचिव पी सी पारेख आणि उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह आणखी तिघांना आरोप म्हणून समन्स बजावण्यात आला आहे.
कॅगच्या अहवालात सरकारला कोळसा खाणींच्या वाटपात १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
या काळात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हाती कोळसा मंत्रालयाचा कारभार होता. त्यामुळे सीबीआयनं याप्रकरणी मनमोहन सिंहांची चौकशीही केली होती. त्यानंतर कोर्टाने आता मनमोहन सिंह यांना समन्स पाठवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.