www.24taas.com, वृत्तसंस्था,नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचं सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप मिळून षडयंत्र रचत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. आमच्याकडे आता ४८ तास असून यामध्ये आम्ही जनतेची जास्तीत जास्त सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दिल्ली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष स्विकारण्यास भाजपाच्या जगदीश मुखी यांनी नकार दिलाय. त्यामुळे आम आदमी पक्षाचे मनिंदरसिंग धीर हेच हंगामी अध्य़क्ष होतील असं केजरीवाल यांनी सांगितलंय.
दिल्लीत २८ आमदार असलेल्या आम आदमी पार्टीला ८ आमदार असलेल्या काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तर ३२ सर्वाधिक जागा पटकावलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यात नकार दिलाय. त्यातच भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस आणि आपवर गंभीर आरोप केलाय. दोघांमध्ये सत्तेसाठी डील झाल्याचे म्हटले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने पुरावे सादर करण्याचे आव्हान दिल्याने भाजपच्या आरोपातील हवाच निघून गेली आहे. मात्र, केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपने सरकार पाडण्यासाठी हालचाली केल्याचे म्हटले आहे. आमच्याकडे केवळ ४८ तास आहेत. यामध्ये जेवढी जनतेची सेवा करता येईल, तेवढी करू असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.