www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटल्या. ‘भाजपला आत्ता दिवाळी साजरी करू दे, आम्ही दिवाळीतच सण साजरा करू’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिलीय तर भाजप पुन्हा एकदा धार्मिकतेचं राजकारण करतंय, याचंच हे संकेत आहेत अशी टीका डाव्यांनी केलीय.
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची शुक्रवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र, त्याआधीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू केला होता. नवी दिल्लीतील मुख्यालय, अहमदाबाद आणि लखनौमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.
मोदी यांच्या निवडीनंतर गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. त्यांच्या आईनंही मिठाई खात आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला आणि भावी वाटचालीसाठी नरेंद्र मोदींना आशिर्वाद दिला.
येडियुरप्पांचाही पाठिंबा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी नरेंद्र मोदींच्या निवडीला पाठींबा दिलाय. विशेष म्हणजे मोदींची तुलना त्यांनी प्रत्यक्ष अटलबिहारी वायपेयींशी केलीय. भविष्यात मोदींनाच पाठींबा राहील तसंच एनडीएलाच पाठींबा राहील असं येदीयुरप्पांनी स्पष्ट केलंय. यामुळे आता येदीयुरप्पा भाजपत परतणार का, तसंच ते त्यांचा कर्नाटक जनता पार्टी हा पक्ष भाजपत विलीन करणार का? हे प्रश्न उपस्थित झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.