www.24taas.com,जयपूर
आगामी लोकसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाणार आहे. या निवडणुकीचा मुख्य मुद्दा विकास असेल. त्यामुळे २०१४ मध्ये देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार असेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे व्यक्त केला.
जयपूर येथे सुरु असलेल्या चिंतन शिबिरात त्या मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी काँग्रेसने राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याने सोनिया गांधी यांनी राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. लोकसभा निवडणुकीसाठी पंधरा महिने शिल्लक असून, सर्वांनी एकत्र मिळून काम केले तर विजय निश्चित असल्याचे सोनिया म्हणाल्यात.
जागतिक मंदिला आळा घालण्यासाठी काँग्रेसने काही कठोर निर्णय घेतले आहेत. काँग्रेस हा देशातील प्रमुक पक्ष असल्याने नागरिकांच्या अपेक्षाही जास्त आहे. त्यासाठी सरकारने पाच कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास आम्ही ढळू देणार नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक महिलेला सुरक्षेचा अधिकार, देशाची भ्रष्टाचारातून मुक्तता, महिलांच्या उद्धारासाठी अनेक योजना तसेच महिला बचतगटांसाठीही योजना आम्ही सुरु करणार आहोत. `आपका पैसा आपके हाथ` या योजनेद्वारे भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिले.
काँग्रेससारखी वैचारिक बैठक इतर कोणत्याही पक्षात नाही. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांने, नेत्याने अत्यंत साधेपणा, समजुतीने जनतेला साद घालणे गरजेचे आहे. प्रत्येक समाजासाठी काँग्रेसच्या मनात आदर आणि स्थान आहे, असे सोनिया म्हणाल्यात.