'मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही'

विजय मल्ल्या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated: Mar 13, 2016, 07:19 PM IST
'मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही'

नवी दिल्ली : विजय मल्ल्या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने म्हटले आहे, '९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यावर केंद्रातील मोदी सरकारची कृपा आहे, त्यामुळेच ते भारतात परतणार नाहीत'.

'केंद्र सरकारची मल्ल्यांवर कृपा असल्याने त्यांचा भारतात येण्याचा विचार नाही. केंद्र सरकार जे वक्तव्य करत आहे ते ठीक आहे. पण त्यांच्या हद्दपारी किंवा त्यासंबंधी काहीही सांगण्यात आलेले नाही', असे काँग्रेस प्रवक्ते टॉम वडक्कन म्हणाले आहेत.