नवी दिल्ली : आपल्या पतीपासून वेगळी राहणारी कमावती पत्नीही पोटगीस पात्र असल्याचा निकाल देत कोर्टाने एका पतीची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत पत्नी गरिब असल्यासच ती पोटगीस पात्र असल्याचे नमूद केले होते.
एका महिलेला किमान एवढी पोटगी मिळाली पाहिजे ज्यात ती आपल्या राहणीमानानुसार आरामात राहू शकेल, जे ती पतीसोबत असताना जगत होती, असं कोर्टानं पुढे म्हटलय.
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट मोनिका सरोहा यांनी निकालात असं म्हटलय की, पोटगीसाठी महिला गरिब किंवा दुसऱ्यांवर आश्रित असेल तरच पोटगी दिली जाते असं नाही तर अचानकपणे आपल्या पतीसोबत राहणीमानापासून दूर जाते म्हणूनही पोटगी मिळू शकते.
एका महिलेच्या अंतरिम पोटगीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निकाल दिला ज्यात त्या महिलेला मानसिक त्रासाला सामोर जावं लागत होतं. कोर्टानं तिच्यावर झालेला अत्याचार लक्षात घेत तिच्या पतीला 35,000 रूपये दरमहा पोटगी देण्याचा निकाल दिला. तिच्या पतीने पत्नीच्या एक लाखाच्या वार्षिक बचतीचे कारण देत पोटगीस नकार दिला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.