नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सम विषम नंबरच्या गाड्या सम विषम तारखेला रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. १ जानेवारी २०१६ पासून हा प्रयोग राबवण्यात आलाय.
दिल्लीतल्या ऑड इव्हन प्रयोगाविषयी दिल्लीकरांनी स्वागत केलेय. तर काहींनी विरोध केलाय. एक जानेवारीपासून दिल्लीत एकाआड एक दिवस सम आणि विषम क्रमांकाच्या गाड्या धावणार आहेत. आजपासून दिल्लीमध्ये हा नियम लागू झालाय.
या प्रयोगाविषयी नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया असल्या, तरी नियम मोडणा-यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिलाय.
- सम-विषम नंबरचा हा प्रयोग सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान लागू असेल.
- रविवारी या नियमाला सुट्टी असेल.
- नियम मोडणाऱ्याला २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
- महिला आणि दुचाकीस्वारांना हा नियम लागू असणार नाही.