नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयनं सुप्रीम कोर्टासमोर क्लीन चिट दिलीय. त्यामुळे, मनमोहन सिंग यांच्या अडचणी आता कमी झाल्यात.
तत्कालीन कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांचा कोळसा घोटाळ्यात कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष सहभाग नव्हता तसंच या घोटाळ्यादरम्यानच्या कोणत्याही निर्णयात मनमोहन सिंग यांचा कोणतंही अप्रमाणिक उद्देश नव्हता, असं सीबीआयनं सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय.
ज्येष्ठ वकील अमरेंद्र सरण यांनी सीबीआयच्यावतीनं आपली बाजू मांडली. न्यायमूर्ती मदन लोकूर, कुरीयन जोसेफ आणि ए के सिक्री यांच्या बेंचसमोर ही सुनावणी झाली. डॉ. मनमोहन सिंग आणि माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बग्रोडिया यांच्यावर घोटाळ्याचा ठपका ठेवता येणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.