www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तर भारतात आज अनेक ठिकांणी भूकंपाचे हादरे बसले. चंदिगढ आणि हिमाचलमध्ये १५ सेकंद भूकंप झाला.
जम्मूमधील काही भागांत भूकंप झाला. सकाळी ८.०२ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. या भूकंपाने कोठेही नुकसान झालेले नाही. भूकंपाची तीव्रता ५.४ रिस्टर स्केल होती.
या भूकंपामुळे हिमाचलमधील चंबा येथे जमीन खचल्याचे वृत्त आहे. तर जम्मूत किश्तवाडापासून १३ किमी अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.