नवी दिल्ली : पक्षांच्या टकरेमुळे केलेले इमरजन्सी लॅडींग आपण बरेच वेळा बघतो पण आता उंदरामुळे विमान लॅंड केलेली घटना समोर आली आहे.
गुरुवारी एअर इंडियाचे विमान दिल्लीवरून मिलानला जात असताना एका छोट्याशा उंदीर मामामुळे पायलटला विमानाची दिल्लीला इमरजन्सी लॅंडींग करावी लागली.
फ्लाईट क्रमांक एआय-१२३ या विमानाने दिल्लीहून मिलानला जाण्यासाठी गुरूवारी दुपारी दिल्लीहून उड्डान केले. उड्डान घेतल्यानंतर काही प्रवाशांनी तसेच विमानातील क्रू-मेंबर्सनी एका उंदराला पाहिले.
त्यानंतर या विमानाला परत दिल्लीला जाऊन उतरवण्याचा निर्णय पायलटने घेतला. त्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाचे इमरजेंसी लॅंडींग करण्यात आले.
विमानाचे दिल्लीत लॅंडींग केल्यानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि संध्याकाळी सहा वाजता या विमानाचे उड्डान झाले.
विमानाची तपासणी केल्यावर कुठलाही उंदीर मिळाला नसल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास चालू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.