ईव्हीएमधील फेरफार प्रकरणी काँग्रेसचे दिग्गज राष्ट्रपतींच्या भेटीला

 नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमधील फेरफार केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 13, 2017, 09:04 AM IST
ईव्हीएमधील फेरफार प्रकरणी काँग्रेसचे दिग्गज राष्ट्रपतींच्या भेटीला title=

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमधील फेरफार केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी सीपीआयचे महासचिव डी राजा आणि इतर नेत्यांचा समावेश होता. 

पुढच्या काळात निवडणूक आयोगानं यावर योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळानं राष्ट्रपतींकडे केली. तर दुसरीकडे याचमुद्यावर काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय...मतदान यंत्रांना काँग्रेसच्या खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वीरप्पा मोईलींनी म्हटलंय. पक्षविरोधी भूमिका मांडल्यानं मोईलींना काँग्रेसनं समन्स बजवाण्यात आलं आहे.