बॅंकेसंबंधी कामे उरकून घ्या, ११ दिवस राहणार बंद

तुमचे काही बॅंकेसंदर्भात काम असेल तर ते तात्काळ पूर्ण करा. कारण जुलै महिन्यात बॅंका ११ दिवस बंद राहणार आहेत.

Updated: Jun 22, 2016, 01:05 PM IST
बॅंकेसंबंधी कामे उरकून घ्या, ११ दिवस राहणार बंद title=

मुंबई : तुमचे काही बॅंकेसंदर्भात काम असेल तर ते तात्काळ पूर्ण करा. कारण जुलै महिन्यात बॅंका ११ दिवस बंद राहणार आहेत.

जुलै महिन्यात पहिला आणि चौथा शनिवार, रविवार सुट्टी आहे. ईदची सुटीबरोबर बॅंकांचे देशव्यापी संप यामुळे बॅंका जवळपास ११ दिवस बंद राहणार आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सहयोगी पाच बॅंका स्टेट बॅंकेत विलिन करण्यात येणार आहेत. याच्याविरोधात हा संप असणार आहे. स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर ही एकच बॅंक १२ ते १६ जुलै दरम्यान बंदचे हत्यार उपसणार आहे.

त्याशिवाय ऑल इंडिया बॅंक एप्लाईज असोसिएशनचे आंदोलन १३ जुलैपासून एसबीआयला सोडून ऑल इंडिया एम्पॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन आवाहनानंतर एसबीबीजीसह अन्य बॅंकाचा देशव्यापी संप असणार आहे.

२९ जुलैला यूनायटेड फोरम ऑफ बॅंक यूनियनच्या आवाहनानंतर एसबीबीजेसह अन्य बॅंकांचे देशव्यापी आंदोलन असणार आहे. तसेच २ जुलैला पहिला शनिवार आणि २३ जुलैला चौथा शनिवार असल्याने बॅंक बंद असणार आहेत. ३, १०, १७, २४ आणि ३१ जुलैला रविवारीची सुटी ६ जुलैला ईदची सुटी आणि १२ ते २८ जुलैला स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अॅंड जयपूरचा संप असणार आहे.