आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही

आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.

Updated: Oct 5, 2015, 04:37 PM IST
आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही title=

नवी दिल्ली: आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.

यादरम्यान, सरकारकडून अधिकृतरित्या दोन एनएसडीएल आणि यूटीआयआयटीएसएलच्या वेब पोर्टलवर नवीन पॅन कार्डसाठी अर्ज घेतले जातील.

एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आयकर विभाग सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनच्या अपग्रेडेशन प्रक्रियेत आहे. पॅन धारकांना सूचित करण्यात येतंय की, विभागाकडून ५ ते ९ ऑक्टोबरपर्यंत पॅन कार्ड वाटप केले जाणार नाही.'

आयकर विभाग पॅन डेटाबेसच्या स्थानांतरणाची मोठी प्रक्रिया पूर्ण करणार आहे. विभागात काही नवीन शुल्क प्रणाली तयार करण्यासाठी हे अपग्रेडेशन गरजेचं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.