मुंबई : केवळ भरघोस पगारवाढ दिली की कर्मचारी खूश होतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं कामं करतात, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चूक ठराल...
कारण, कर्मचारी वेतन आणि बोनसपेक्षा लाईट वर्क शेड्युल आणि वेगळी ओळख याला महत्त्व देताना दिसतायत. आपल्या कामांच्या वेळांमध्ये थोडी लवचिकता असावी, अशी त्यांची इच्छा आहे, असं नुकत्याच एका अहवालातून समोर आलंय.
टॉप एन्प्लॉयर्स इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या 'वेतन आणि लाभ' रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, कर्मचाऱ्यांमध्ये बोनस आणि वेतनाच्या प्रमाणात 'आर्थिक गोष्टींशिवाय इतर सुविधां'चं महत्त्व अधिक आहे.
हा सर्व्हे 96 देशांमधल्या 600 कंपन्यांच्या नमुन्यांच्या आकारावर आधारित होता. 'टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी डेव्हिड प्लिंक यांच्या म्हणण्यानुसार, वेतन हा खूप महत्त्वाचा भाग आहेच... परंतु, कर्मचाऱ्यांना आपल्याकडे दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी दिलेल्या कामाच्या वेळेत लवचिकता, नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी, विकास आणि ओळख यांसारख्या गोष्टी निर्णायक ठरतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.